हवामान खात्याचा इशारा, पुढील चार दिवस 22 राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (11:13 IST)
राजधानी दिल्लीमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. मागील 15 दिवसांपासून दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये पाऊस सुरु आहे.  
 
हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी दिल्ली मध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा यलो अलर्ट घोषित केला आहे. आज दिल्लीचे अधिकतम तापमान 35°C आणि न्यूनतम तापमान 26°C राहण्याची शक्यता आहे.  
 
तसेच आज दिल्ली शिवाय पंजाब, हरियाणा, चंदिगढ, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, लक्षद्वीप, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, अंदमान निकोबार द्वीप समूह, केरळ, तामिळनाडू, लद्दाख, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस पडण्याची शकयता आहे. हवामान विभागाने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अलर्ट राहणे आणि नदी-नाले-समुद्र यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती