ढग आजही मुसळधार बरसतील; देशातील 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (11:45 IST)
राजधानी दिल्ली मध्ये सोमवारी रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी देखील मुसळधार पाऊस कोसळू शकतो.  
 
तसेच पुढील 24 तासांमध्ये उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, उप-हिमालयी पश्चिम बंगाल, झारखंड, पूर्वोत्तर भारत, केरळ, तामिळनाडू, रायलसीमा आणि दक्षिण आंतरिक कर्नाटकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. तर, राजस्थान, पश्चिम बंगाल मध्ये गंगा तटवर्ती क्षेत्र, बिहार, ओडिसा, तटीय आंध्र प्रदेश, विदर्भ, दक्षिण आंतरिक कर्नाटक, गोवा, तटीय कर्नाटक, तटीय महाराष्ट्र, पूर्वी गुजरात, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार लक्षद्वीप समूह मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 
 
तसेच बिहारची राजधानी पटना सोबत पूर्ण बिहारमध्ये मानसूनचा प्रभाव बनलेला आहे. पटना सोबत राज्यातील अनेक शहरांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी पटना सोबत गोपालगंज, सिवान, बक्सर, कैमूर व रोहतासमध्ये पावसाचा  येलो अलर्ट घोषित केला आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती