भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना चिरडले, 3 जणांचा मृत्यू

गुरूवार, 12 डिसेंबर 2024 (10:03 IST)
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील क्रॉसिंग रिपब्लिक परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या काही लोकांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी माहिती बुधवारी दिली.
ALSO READ: महाराष्ट्रात महायुतीचा मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला,14 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची संभावना
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील विजय नगर कॉलनीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर रस्ता ओलांडणाऱ्या चार जणांना वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस स्टेशन प्रभारी  यांनी सांगितले की, एकाचा जागीच मृत्यू झाला. इतर तीन जखमींना रुग्णालयात पाठवलेजिथे  दोन महिलांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला व एका महिलेवर  दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती