मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात टॉयलेट पाईपमध्ये 6 महिन्यांचा गर्भ सापडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शौचालयाच्या पाईपमध्ये पाणी साचल्याचे घरमालक यांच्या लक्षात आले आणि पाईप तोडले असता त्यांना त्यात गर्भ अडकलेला दिसला टॉयलेटच्या पाईपमध्ये अडकलेला 6 महिन्यांचा गर्भ बाहेर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच इंदिरापुरम पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोकही घटनास्थळी जमा झाले. गर्भ सुरक्षित ठेवण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इंदिरापुरमचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, आता या गुन्ह्यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी कडक चौकशी केली जाईल. व पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.