मुसळधार पावसामुळे निर्माणाधीन घराची भिंत कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 29 जून 2024 (11:01 IST)
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक अपघात घडत आहे.  ग्रेटर नोएडा मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे नवीन बांधल्या जाणाऱ्या घराची भिंत कोसळली आहे ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
भीषण उन्हाळानंतर आता पावसाळा सुरु झाला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.तसेच राजधानी दिल्लीमध्ये देखील पाऊस पडत आहे. ग्रेटर नोएडा मध्ये अशीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. पावसामुळे निर्माणाधीन घराची भिंत कोसळली. यामध्ये आठ मुले दाबली गेली तर तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. बाकी मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख