मुंबई क्राइम ब्रांच ने मोठी कारवाई करीत बनावट दक्षिण कोरियाई व्हिसा रॅकेट चालवण्याच्या आरोपांमध्ये एक नौदलाच्या अधिकारीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो लेफ्टिनेंट कमांडर रँकचा अधिकारी आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकारावर बनावट कागदपत्र बनवून लोकांना विदेशात पाठवण्याचा आरोप आहे. या करिता लाखो रुपये देखील घेण्यात आले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाचे लेफ्टिनेंट कमांडर रँकचे अधिकारीला रॅकेट चालवण्याच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली आहे. या रॅकेट मध्ये तो बनावट कागदपत्र बनवून लोकांना दक्षिण कोरियाची यात्रा करण्यासाठी पाठवत होता. मुंबई क्राइम ब्रांचला एक नेवी ऑफिसरच्या बनावट कागदांवर लोकांना विदेशात पाठ्वण्यात येणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची सूचना मिळाली.
प्रत्येक व्यक्तीकडून दहा लाखाची वसुली-
मुंबई क्राइम ने जेव्हा या रॅकेटशी जोडलेल्या लोकांसची चौकशी केली. तेव्हा त्यांनी आपला गुन्हा काबुल केला. अधिकारींनी सांगितले की, या पूर्ण प्रक्रियेमध्ये हे आरोपी लोकांकडून प्रत्येकी दहा लाख रुपये घेत होते.