यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये धडकणार

शुक्रवार, 7 मे 2021 (07:50 IST)
जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 10 जूनपर्यंत तळकोकण तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
 मान्सून केरळनंतर सामान्यत: पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होतो, त्या-त्या वेळच्या स्थितीनुसार तो लवकर किंवा विलंबाने पोहोचतो. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रात कधी आगमन होईल याबाबत उत्सुकता आहे.
 
यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
 
पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती