आयएमडीने यावेळी पहिल्यांदाच देशातील 36 हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात ला निनो स्थिती तयार झाल्याचा फायदा मान्सूनला होणार आहे.
हवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण आणि पूर्व विदर्भात जूनमध्ये सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल.