कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Webdunia
रविवार, 13 ऑक्टोबर 2024 (15:48 IST)
दसऱ्याच्या सोहळ्याच्या दरम्यान दक्षिण दिल्लीतील चिराग परिसरात रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. या रामलीलेत रावणाचा भावाची कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे मंचावर हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले. 

या कलाकाराचा कार्यक्रमाच्या मध्ये अचानक छातीत वेदना जाणवल्या आणि तो खालीच बसला त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

सदर घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या एका कलाकाराला छातीत दुखू लागल्यानन्तर तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्याला मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विक्रम तनेजा असे या मृत कलाकाराचे नाव असून तो पश्चिम विहारातील रहिवासी आहे. त्याच्या मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबियांचे जबाब नोंदवले असून त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही.असे पोलिसांनी सांगितले. 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख