तेजस एक्सप्रेस आजपासून पुन्हा रुळावर धावेल, वेळापत्रक जाणून घ्या

शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (10:42 IST)
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने घोषणा केली आहे की अहमदाबाद-मुंबई आणि लखनऊ-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेस गाड्या शनिवारपासून पुन्हा सुरू होतील.
 
आयरसीटीसीनुसार, ट्रेन क्रमांक 82901/82902 अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद आणि ट्रेन क्रमांक 82501/82502 लखनऊ-नवी दिल्ली-लखनौ आठवड्यातील चार दिवस सोमवार,शुक्रवार,शनिवार आणि रविवारी धावणार. प्रवासी IRCTC वेबसाइट irctc.co.in किंवा IRCTC रेल कनेक्ट अॅपवर तिकीट बुक करू शकतात. कोविड - 19 साथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रेल्वेने तेजस एक्सप्रेसचे संचालन थांबवले होते.
 
ऑक्टोबर 2019 मध्ये नवी दिल्ली-लखनऊ तेजस एक्सप्रेस सुरू करण्यात आली. आयआरसीटीसीद्वारे पूर्णतः चालवलेली ही पहिली ट्रेन होती. प्रत्येक दिशेने प्रवास पूर्ण करण्यासाठी सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. 25 लाख रुपयांच्या रेल्वे प्रवास विम्यासह ही ट्रेन प्रवाशांना विविध आधुनिक सुविधा मोफत देते.
 
अहमदाबाद-मुंबई मार्ग जानेवारी 2020 मध्ये सुरू झाला. यात प्रत्येकी 56 आसनांसह दोन एक्झिक्युटिव्ह क्लास चेअर कार आहेत, तसेच आठ चेयर कार आहेत, प्रत्येकी 78 सीटची क्षमता आहे. प्रवाशांना उच्च दर्जाचे अन्न आणि पेये पुरवले जातात, जे तिकीट भाड्यात समाविष्ट आहेत. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात पाण्याच्या बाटलीशिवाय आरओ वॉटर फिल्टर बसवण्यात आले आहे. या ट्रेनच्या प्रवाशांना 25 लाख रुपयांपर्यंतचा रेल्वे प्रवास विमा देखील दिला जातो.
 
तेजस एक्स्प्रेसचे डबे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोईसाठी स्मार्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. इंटेलिजेंट सेन्सर-आधारित प्रणालीच्या मदतीने प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्याचे स्मार्ट कोचचे उद्दिष्ट आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती