JEE Main Result 2021 Declared: जेईई मुख्य निकाल जाहीर, 17 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले; या Direct Link द्वारे तपासा

शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (23:06 IST)
JEE Main 2021 Result Declared: संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) 2021 (JEE Main 2021 निकाल) च्या तिसऱ्या सत्राचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी आता jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे गुण तपासू शकतात.
 
जे उमेदवार आवश्यक कट-ऑफ पूर्ण करून जेईई मेन्स 2021 परीक्षा उत्तीर्ण करतील ते जेईई एडवांस आणि एनआयटी, आयआयटी आणि सीएफटीआयमध्ये प्रवेशासाठी पात्र असतील. JEE Advanced परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल.
 
जेईई मेन 2021 सत्र 3 मध्ये शुक्रवारी जाहीर झालेल्या एकूण 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले. जेईई मेन 2021 चे अंतिम सत्र 26 ऑगस्टपासून आयोजित केले जाईल. याशिवाय, B.E आणि B.Tech प्रवेश परीक्षा 27, 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर रोजी होणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती