पत्नीच्या छळाला कंटाळून टीसीएस कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (14:38 IST)
आग्र्या येथील एका टीसीएस कंपनीच्या  मॅनेजरने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की त्याची पत्नी त्याला किती छळत असे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 
ALSO READ: पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी न्यायालयात दाखवता येईल, पण अनोळखी लोकांना नाही- दिल्ली विद्यापीठ
सदर येथील डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी मानव शर्मा हा मुंबईतील टीसीएस कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यांचे वडील नरेंद्र शर्मा हे हवाई दलातून निवृत्त झाले आहेत आणि मानव हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मानवचे लग्न एक वर्षापूर्वी 30 जानेवारी 2024 रोजी झाले. लग्नापासूनच त्याच्या पत्नीने त्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे, म्हणून तो तिला सोबत मुंबईला घेऊन गेला
ALSO READ: पंतप्रधान मोदींच्या "विकसित भारत" या आवृत्तीने सामान्य लोकांचे खिसे रिकामे केले- मल्लिकार्जुन खरगे
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
ALSO READ: अलकनंदा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
24 फेब्रुवारी रोजी सकाळी मानवने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी मानवला पंख्याला लटकलेले पाहिले तेव्हा एकच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी मानवला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 
<

Another man forced to take his own life by his wife. Agra, UP.

- Manav Sharma
- Worked as a manager at TCS
- Got married in January 2024
- Took his wife to live with him in Mumbai for work
- His wife threatened to file false cases
- She wanted to live with her… pic.twitter.com/4atXqVp7KO

— Baba Banaras™ (@RealBababanaras) February 28, 2025 >
मानवने आत्महत्या करण्यापूर्वी 6.57 मिनिटांचा व्हिडिओ बनवला. त्यात तो म्हणत आहे की पुरूषांबद्दलही विचार करा, कृपया कोणीतरी पुरूषांबद्दल बोलले पाहिजे. बिचारे खूप एकटे आहेत, माफ करा पप्पा मम्मी, माफ करा अक्कू. मी गेल्यावर सगळं ठीक होईल, माझ्या आत्महत्येबद्दल माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका.
 
Edited By - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख