तसेच राजस्थान, पंजाब, गुजरात आणि काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण वातावरणामुळे अनेक गाड्यांवरही परिणाम झाला आहे. यामध्ये, भारतीय रेल्वेने राजस्थानमधील शहरांना धावणाऱ्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, "ब्लॅकआउट" आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. याशिवाय अनेक गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहे.