फुले कृषी विद्यापीठाकडून खा. शरद पवार, मंत्री गडकरींना डॉक्टरेट

गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (20:50 IST)
देशातील राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठे स्थान आहे. त्यांचा मान, सन्मान मोठा आहे.
 
अहमदनगर - राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभ गुरुवार (दि. 28 ऑक्टोबर) कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परीसरात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्यबपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलपती भगत सिंह कोश्यारी होते. कार्यक्रमास प्रतिकुलपती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तथा, कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सहकार, कृषी, विकास आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यापीठाकडून कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. दीक्षांत भाषण उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठोड यांनी केले. या समारंभासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, विद्यापीठ कार्यकारी आणि विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती