अग्नी - 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (12:40 IST)
5000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केली आहे.
 
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली आहे.
 
या क्षेपणास्त्रातल्या विशेष तंत्रज्ञानामुळे याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रं लावता येऊ शकतात आणि यामुळे एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेतला जाऊ शकतो. अग्नी-V ची यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंध क्षमता साध्य करण्याच्या भारताच्या धोरणाशी सुसंगत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती