बस दरीत कोसळून 8 मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केला

गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (12:53 IST)
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक मिनी बस अनियंत्रितपणे खोल दरीत कोसळून आठ जण ठार तर १२ जण जखमी झाले. सुई गोवारी परिसरात दरीत कोसळल्याने मिनी बसचे तुकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
 
पीएम मोदींनी डोडा येथील बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले- डोडाच्या थत्री येथे झालेल्या अपघातामुळे मी दु:खी आहे. या दु:खाच्या काळात माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबासोबत आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. या रस्ता अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांना PMNRF कडून 2 कोटी रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम दिली जाईल.
 

An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives due to the accident in Jammu and Kashmir. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) October 28, 2021
काही जखमींचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला तर काहींचा जीएमसी डोडा येथे मृत्यू झाला. मिनी बस दोडाहून थत्रीकडे जात असताना हा अपघात झाला. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती