राज्यसभेच्या चार जागांवर राष्ट्रपतींकडून नियुक्ती

शनिवार, 14 जुलै 2018 (15:39 IST)
राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं आज जाहीर केली आहेत. आज राज्यसभेवर चार खासदारांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केली आहे. यामध्ये राम शकल, राकेश सिन्हा, रघुनाथ मोहापात्रा, सोनल मानसिंग यांचा सहभाग आहे. या चारही दिग्गज अपाआपल्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. विशेष म्हणजे येत असलेली निवडणूक 2019 पाहता भाजपाने चार वेगवेगळ्या राज्यातून चार जणांची निवड केलीय. 
 
राज्यसभेवरील निवृत्ती मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनू आगा, अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला आहे. या जागा राष्ट्रपतीनियुक्त करतात. त्यात 12 पैकी चार जागा जागा रिकाम्या झाल्या होत्या त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज निवड केली आहे. यावेळी चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही दिग्गज व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाही. या नवनिर्वाचित चार खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते राम शकल, लेखक-स्तंभकार राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा, शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंग यांचा समावेश आहे. यामध्ये राम शकल उत्तरप्रदेशमधील आहेत. राकेश सिन्हा संघ विचाराचे असून ते टिव्ही चॅनेलवर भाजपाची बाजू मांडत असतात. राकेश सिन्हा दिल्ली विद्यापिठामध्ये प्राध्यापक आहेत. सोनल मानसिंह या देशातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा आहेत. ओडिशाचे शिल्पकार रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिराचे महत्वपूर्ण काम केले  आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती