राज्यात लवकरच आयटी मंत्रालय सुरू होणार

गुरूवार, 12 जुलै 2018 (08:36 IST)
सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती-तंत्रज्ञान (आयटी) संचालनालय आहे. त्याला अर्थ आणि सांख्यिकी विभाग, एमआरएसएससी विभाग जोडून स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
आयटी विभागातून दरवर्षी १८ हजार कोटींचा महसूल मिळतो. ऑनलाईन सेवांमध्ये वाढ झाली आहे. कर्नाटक सरकारने आयटीबीटी हब सुरू केले. त्यादृष्टीने महाराष्ट्रात स्वतंत्र मंत्रालय सुरू करणार का, असा प्रश्न शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामान्य प्रशासन विभागात आयटी संचालनालय असून त्यास सचिवही आहेत. याचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव होता. या संचालनालयाचे स्वतंत्र आयटी मंत्रालय करण्याचा निर्णय घेऊ. त्यास अर्थ व सांख्यिकी, एमआरएसएससी हे दोन विभाग जोडून घेतले जातील अशी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती