अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेपाळी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (21:14 IST)
ओडिशातील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी.टेकच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीने तिच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेपासून संस्थेत तणावाचे वातावरण आहे.  
ALSO READ: नाशिकमध्ये ट्रक क्रेनला धडकल्याने २ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी नेपाळची रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या भावाने तक्रार दाखल केली आहे की, त्याच्या बहिणीने रविवारी तिच्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. भुवनेश्वरचे डीसीपी म्हणाले, “आम्ही इन्फोसिटी पोलिस स्टेशनमध्ये एका विद्यार्थ्याविरुद्ध विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विद्यार्थी पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर गॅझेट जप्त केले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.” डीसीपींनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले आहे.
ALSO READ: महुआच्या लोभापोटी अस्वल चढले झाडावर, जोरदार विजेचा धक्का बसून मृत्यू
नेपाळी विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले
या घटनेनंतर नेपाळी विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्याची माहिती केआयआयटीने दिली आहे. यानंतर, अधिकाऱ्यांनी संतप्त परदेशी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. संस्थेने म्हटले आहे की, "परिस्थिती लक्षात घेऊन, नेपाळी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.  
ALSO READ: अजित पवार म्हणाले मुंडेंना विचारा की ते मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे का?
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती