मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे एक भीषण रस्ता अपघात घडला, ज्यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग १८ वरील मंचबंधाजवळ हा अपघात झाला. ऑटो आणि एसयूव्हीची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचालक आणि आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू ऑटो बारीपाडाहून येत होता आणि बेटनोटीकडे जात होता. या अपघातात ऑटोमध्ये प्रवास करणारे दोघे जागीच ठार झाले, तर स्कॉर्पिओमध्ये प्रवास करणारे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.