मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला त्याच्या पत्नीची हत्या करून ती आत्महत्येसारखी वाटवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर त्यांची पत्नी आणि ४ वर्षांची मुलगी हे मुरादाबादमधील बुद्धि विहार येथे राहत होते. त्यांनी सांगितले की,
बुधवारी रात्री 35 वर्षीय महिला शिक्षिका तिच्या बेडरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली. ही माहिती मृत महिलेच्या मुलीने आज्जीला सांगितली. ही बातमी मिळताच मृत महिलेचे पालक मुरादाबादला पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तसेच माझोला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले की, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे