Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने पत्नीच्या हत्येचा आरोप असलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने त्या व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला आणि तिची हत्या केली. तसेच आरोपी 2021 पासून तुरुंगात होता. 27 जानेवारी रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी श्रवण कुमार याला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रवण कुमार आणि त्यांची पत्नी बरेलीच्या सीबी गंज परिसरातील सर्वोदय नगरमध्ये राहत होते. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, श्रवण कुमार अनेकदा दारू पिण्यासाठी पैसे मागत असे. याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत.11 ऑगस्ट 2021 रोजी श्रावण दारूच्या नशेत घरी परतला. त्याची पत्नीने याला विरोध केला, त्यानंतर श्रवण रागाने घराबाहेर पडला. तो रात्री 11:30 च्या सुमारास परतला आणि त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्याने पत्नीच्या पोटात चाकूने वार केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सीबी गंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांनी 13 ऑगस्ट 2021रोजी आरोपीला अटक केली होती.