डीएसपी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी सुनीलने आधीच हत्येची योजना आखली होती. घटनेच्या दिवशी दोघेही कारमध्ये होते. त्याच वेळी मॉडेलच्या मोबाईलवर दुसऱ्या एका तरुणाने फोन केला. हे पाहून सुनील संतापला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात सुनीलने शीतलवर चाकूने हल्ला केला. व आरोपीने योजनेनुसार तिची कार कालव्यात फेकून दिली. पोलिसांनी कार जप्त केली आहे.