लाखो रुपये किमतीचा मयुरी मासा जाळ्यात अडकला

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (11:01 IST)
जगभरात असे अनेक दुर्मिळ प्राणी आहेत, ज्यांच्या बद्दल आपण ऐकतो मात्र ते पहायला मिळत नाहीत. असाच प्रकार समोर आला असून, ओदिशाच्या समुद्र किनाऱ्यावरही असाच एक दुर्मिळ मासा पकडला आहे. त्याचा एखाद्या पक्षाप्रमाणे चेहरा असलेला हा ‘मयूरी मासा’ नावाने प्रसिद्ध आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या या माशाची आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंच्या घरात किंमत असून, मोराप्रमाणे चेहरा असल्याने या माशाला स्थानिक नागरिक मयूरी मासा म्हणतात. 
 
ओडिशाच्या राजनगर येथील तालचुआ परिसरातून हा मासा जाळ्यात अडकला आहे. केंद्रपारा जिल्ह्यातील एका मच्छिमार मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेला असता त्याच्या जाळ्यात हा मासा अडकला. या माशामुळे त्या मच्छिमाराचं नशीब उजळले आहे. हा मासा 20 किलोग्राम वजनाचा असून,  2 लाख रुपयांना विक्री होण्याची शक्यता आहे. या दुर्लभ प्रजातीच्या माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ताशी 135 किमी इतका या माशाचा कमाल वेग असल्याची माहिती आहे.
 
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ओडिशाच्या चंदवाली भागात ड्रोन सागर नावाचा एक अनोखा मासा आढळला होता. तब्बल १०७ किलो वजनाचा हा मासा एका औषध कंपनीने ७ लाख ४९ हजार रुपयांत खरेदी केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती