भारत पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करणार

सोमवार, 4 नोव्हेंबर 2019 (10:21 IST)
भविष्यात पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करण्यात येईल असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे. ते दिल्लीमध्ये बोलत होते. आम्ही सुद्धा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करु शकतो हे दाखवून देण्यासाठी इस्त्रो कटिबद्ध आहे. त्यासाठीच्या योजनेवर काम सुरु आहे अशी माहिती सिवन यांनी दिली.
 
लँडिंग संदर्भात सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून आणण्यासाठी अमूल्य माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. नजीक भविष्यात इस्रो अनुभव, ज्ञान आणि टेक्निकल क्षमतेद्वारे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करु शकतो हा दाखवून देईल असे सिवन म्हणाले. 
 
सात सप्टेंबरला चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरच्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगमध्ये इस्रोला यश मिळाले नव्हते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या काही मिनिट आधी विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संर्पक तुटला होता. चंद्रावर विक्रम लँडरचे नेमके काय झाले ते अजून स्पष्ट झालेले नाही. विक्रम लँडरच्या लँडिंगसंबंधीचा महत्वाचा डाटा अवकाश संस्थेकडे उपलब्ध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती