दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाला पाहता सर्व शाळांना 5 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, सर्व प्रकारच्या बांधकामांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याशिवाय दिल्लीमध्ये फटाके फोडण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. ‘दिल्लीमध्ये पेंढ्यांच्या वाढत्या धुरामुळे प्रदूषणाच्या स्तरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने 5 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे’, असं ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.