हत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी असून, 'पोक्सो'च्या गुन्ह्यांमध्येही राज्यात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. तर, दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशचा देखील नंबर लागतो.
तर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून, गेल्यावर्षी बिहारमध्ये 4 हजार 736 दंगलीचे गुन्हे दाखल झाले. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये 4 हजार 478 दंगलीचे गुन्हे दाखल असून, उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.