या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या कोर्टाने महिनाभरापूर्वीच या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत.याशिवाय त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. माजी खासदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जेडीएसने त्यांना पक्षातून निलंबितही केले होते.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने वकिलांना निर्देश दिले की, प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये विशिष्ट तपशील नमूद करण्याऐवजी पीडितांच्या नावांचा उल्लेख टाळावा.सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
हसनमध्ये मतदान केल्यानंतर एक दिवसानंतर प्रज्वल २७ एप्रिलला जर्मनीला गेला होता. सीबीआयने त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी विशेष न्यायालयाने हसन खासदाराविरुद्ध १८ मे रोजी अटक वॉरंट जारी केले होते. 31 मे रोजी प्रज्वल बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर पोहोचताच एसआयटीने त्याला ताब्यात घेतले.