100 दिवसानंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो करोना !

बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (11:18 IST)
भारतात करोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. ही माहिती देत देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आल्याचेही ICMR प्रमुख बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले.
 
याचा अर्थ एकदा करोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर रुग्णाला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. भार्गव म्हणाले की भारतात करोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. 
 
भारतात पुनर्संसर्गाची तीन प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे. जागतीक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दोन डझन पुनर्संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती