किम जोंग उन यांना रडू कोसळलं

बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (10:59 IST)
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन लष्कराचे आभार मानताना भावूक झाले. लष्कारातील जवानांनी देशासाठी मोठं बलिदान दिलं आहे असं म्हणताना किम जोंग उन यांना रडून आलं. देशातील सत्ताधारी पक्षाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
 
हुकूमशाह म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किम जोंग उन यांच्यावर कायमच टीका होत असते. अशात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना किम जोंग उन यांना रडू आल्याने या गोष्टीची उत्तर कोरियाबरोबरच संपूर्ण जगामध्ये चर्चा आहे. करोना संकटाच्या कालावमध्ये आपण देशातील जनतेसोबत ठामपणे उभं राहू शकलो नाही असं सांगत किम जोंग उन यांनी जनतेची माफी मागितली आणि त्यांना रडू आलं, असं रॉयटर्सच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
 
या दरम्यान त्यांनी उत्तर कोरियामध्ये करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती