हिंदु धर्मात प्रदक्षिणेला खूप महत्व आहे. प्रदक्षिणेचा अर्थ आहे की एखाद्या स्थळ किंवा एखाद्या माणसाच्याच्या भोवती डाव्याबाजूने फिरणे. याला प्रदक्षिणा घालणे देखील म्हणतात. प्रदक्षिणा हा षोडशोपचार पूजेचा एक भाग आहे. प्रदक्षिणाची प्रथा फार जुनी आहे. देऊळ, तीर्थक्षेत्र, देव, नदी, झाडे इत्यादींची प्रदक्षिणा घालण्याचं वेगळंच महत्व आहे. पिंपळाची प्रदक्षिणा घालण्यानं काय फायदे होतात हे जाणून घ्या-
1 स्कंद पुराणात उल्लेखित पिंपळाच्या झाडात सर्व देवांचं वास्तव्य आहे. पिंपळाच्या सावलीत ऑक्सिजनाने समृद्ध असं आरोग्यदायी वातावरण तयार होतं. या वातावरणाने वात, पित्त आणि कफाचे शमन आणि नियमन होतात आणि तिन्ही परिस्थितीं मध्ये संतुलन बनतं. म्हणून पिंपळाच्या किमान 108 प्रदक्षिणा घालण्याचं नियम आहे.
3 अश्वतथोपनयन व्रताशी निगडित महर्षी शौनक म्हणतात की मंगल मुहुर्तात पिंपळाच्या झाडाच्या 3 प्रदक्षिणा घेतल्यानं आणि त्यावर पाणी अर्पित केल्यानं दारिद्र्य, दुःख आणि दुर्देवाचा नाश होतो. धन आणि समृद्धी वाढते. पिंपळाचे दर्शन आणि पूजा केल्यानं दीर्घायुष्य आणि भरभराट मिळतं. अश्वत्थ व्रत केल्यामुळे मुली सौभाग्य मिळवतात.