बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीसुद्धा तुरुंगात गेलो होतो- नरेंद्र मोदी

शनिवार, 27 मार्च 2021 (12:23 IST)
'बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेन. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो,' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 
केलं आहे.
 
बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा 
असून त्यांनी बांगलादेशच्या दौऱ्यातच हे विधान केलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख मुजीबूर रहमान यांना मरणोत्तर घोषित झालेला गांधी शांती पुरस्कार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे सुपुर्द केला. बांगलादेश 
आणि भारताचे संबंध अधिक दृढ होत आहेत. त्यामुळे मला हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे, असं त्यांनी म्हटलं.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती