माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम जिहादी होते: महंत

गुरूवार, 25 मार्च 2021 (11:08 IST)
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एका मंदिरात एका मुस्लीम तरुणाला पाणी पिण्यावरून धक्काबुक्की, मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. आता त्याच मंदिरातील एका महंतांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
 
दसना देवी मंदिरातील यती नरसिंहानंद सरस्वती असं या महंतांचं नाव आहे.
 
उच्च पातळीवर पोहोचलेलेला कोणताही मुस्लीम व्यक्ती देशप्रेमी असू शकत नाही. अब्दुल कलाम हेसुद्धा जिहादीच होते, असं नरसिंहानंद सरस्वती पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
यावेळी नहसिहांनंद यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. कलाम DRDO प्रमुख असताना त्यांनीच अणुबॉम्बचा फॉर्म्युला पाकिस्तानला दिला होता, असा आरोपही सरस्वती यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती