गुजरात मध्ये एस टीचा संप अनेक फेऱ्या रद्द प्रवासी वर्गाचे हाल

शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (09:11 IST)
गुजरात येथील एस टी कर्मचारी वर्गाला सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह अन्य 9 मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे गुजरात येथील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. कर्मचारी कामावर न आल्याने एसटी विभागाला अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. गुरुवारी सौराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, या कारणाने  एसटीच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम संपूर्ण वाहतुकीवर झाला असून, जवळपास 50 हजार विद्यार्थी आणि दीड लाख प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे याचा फायदा उचलत  खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लुटालूट सुरु होती. सौराष्ट्र विभागातील 512 आणि 198 एक्स्प्रेस बसेस बंद आहेत. सर्वाधिक समस्या ऑनलाईन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्भवली असून, संपामध्ये 3 कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. अनुचित घटना न घडण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती