नारायण राणे यांचा बंडाचा पवित्रा

बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (09:49 IST)
युती झाल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेत भाजपच्या वतीने निवडून गेलो असलो तरी खासदारकीचा राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेच्या वतीने निवडणूक लढतील. याशिवाय अन्य काही मतदारसंघांमध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार रिंगणात असतील, असे राणे यांनी सांगितले.
 
राणे आणि शिवसेनेतील संबंध लक्षात घेता, युतीनंतर राणे यांना कोकणात माघार घेणे शक्य नाही. यातच राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी लोकसभा लढविण्याची तयारीही केली आहे. युतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेल्या वेळी शिवसेनेचे विनायक राऊत या मतदारसंघातून निवडून आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती