TVS ची धमाल मचावून देणारी बाइक येत आहे, पेट्रोलसह बॅटरीने देखील चालेल

मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (18:27 IST)
कंपन्या आता पेट्रोल इंजिनांसह इलेक्ट्रॉनिक बाइक देखील बाजारात लॉचं करत आहे. त्याचप्रमाणे, टीव्हीएस आपली कॉन्सेप्ट बाइक Zeppelin ला यावर्षी बाजारात आणू शकते. कंपनीने या बाइकमध्ये 220cc पेट्रोल इंजिनासह इलेक्ट्रिक मोटर देखील प्रदान केली आहे, जे तिला आणखी शक्तिशाली बनवते. या हायटेक क्रूझर बाइकची झलक कंपनी ऑटो एक्सपो 2018 मध्ये दाखवली होती. बाइकमध्ये 48-व्होल्ट लिथियम-आयन बॅटरीसह 1200 वॉट रिजर्वेटिव्ह असिस्ट मोटर आहे. हे बाइकमध्ये 20 टक्क्यांहून अधिक टॉर्क निर्माण करतात. तथापि, बाइकच्या इंजिनच्या शक्तीबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नाही.
 
ही बाइक पॉवरफुल होण्याबरोबरच स्टाइलिश देखील आहे. Zeppelin मध्ये रोबोटच्या चेहऱ्यासारखेच LED लॅम्प आहे आणि त्यामध्ये हलोजनसारखी दिसणारी लाइट लागलेली आहे. बाइकमध्ये दमदार आलोय व्हील बरोबर ट्यूबललेस टायर्स देखील मिळतील. या बाइकमध्ये कंपनीने बायो नामक स्मार्ट ऍक्सेस स्विच दिला आहे. तथापि, त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक तपशील उघड केले गेले नाहीत. 
 
बाइकमध्ये ऍक्शन कॅमेरा, क्लाउट कनेक्टिविटी इन्फोटेनमेंट मीटर आणि कंट्रोल करण्यासाठी एबीएस देखील दिलेला आहे. बाइकच्या किंमतबद्दल कंपनीने सध्या काहीच माहिती दिली नाही आहे, पण अहवालानुसार, या बाइकची किंमत 1.50 लाख ते 2 लाखापर्यंत होऊ शकते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती