आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी

बुधवार, 14 डिसेंबर 2022 (17:23 IST)
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज 10 वा दिवस आहे. सवाई माधोपूरच्या भदोती गावातून सुरू झालेल्या दहाव्या दिवसाच्या यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही सहभागी झाले होते.रघुराम राजन यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  
आज ही यात्रा 25 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. आज सवाई माधोपूर येथून यात्रा दौसा जिल्ह्यात दाखल झाली.  दौसा हा राजस्थानचा 5 वा जिल्हा आहे, जिथे यात्रा पोहोचली आहे. आज राहुल गांधींसोबत गोविंद सिंग दोतासरा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हेही यात्रेत सहभागी झाले . राहुल गांधी यांनी बागडी गावात सभेलाही संबोधित केले. 
 
मंगळवारी सवाई माधोपूर येथील सुरवळ येथे सुरू झालेल्या यात्रेत अशोक गेहलोत, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, सुखजिंदर सिंग रंधवा आणि सचिन पायलट सहभागी झाले होते. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल तेव्हा नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला राहुल गांधींचे स्वागत करतील 
 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती