बिहारच्या सीमावर्ती भागात आणि नेपाळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे किनारी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून बचावकार्य जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पूराचा वेढा पडलेल्या गावांमधून तब्बल ४.६४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तसेच या पूरग्रस्तांच्या सोयीसाठी १,२८९ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे.