दोन्ही देशांच्या सीमेवर राहणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ राम’ नावाच्या ग्रुपमधील तरुणांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत सादर केलं होतं. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘पाक सरजमीन’ सादर करण्यात आलं. त्यामुळे ‘व्हॉईस ऑफ राम’ बँडविरोधात विविध स्तरातून टीकेची झोड उठली होती. पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी मात्र ‘जन-गण-मन’ सादर करुन अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं आहे. एकत्रित गायलेल्या या राष्ट्रगीतांना ‘शांतिगीत’ असं नाव देण्यात आलं आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.