माता वैष्णो देवीचे मंदिर कुठे आहे, येथे दररोज किती भाविक येतात जाणून घ्या

शनिवार, 1 जानेवारी 2022 (09:32 IST)
जम्मू-काश्मीरमध्ये नववर्षादरम्यान वैष्णोदेवी मंदिराच्या आवारात चेंगराचेंगरी झाल्याने अनेक जण जखमी झाले आणि 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात सध्या मदतकार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
 
 
चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून येथे नवीन वर्षाच्या निमित्ताने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
 
जम्मू- काश्मीर राज्यातील जम्मू जिल्ह्यातील कटरा शहरात असलेले वैष्णो देवी मंदिर सुमारे 700 वर्षांपूर्वीचे आहे. जे ब्राह्मण पुजारी पंडित श्रीधर यांनी बांधले होते. हे मंदिर कटरा पासून 12 किलोमीटर अंतरावर 5,200 फूट उंचीवर आहे. दरवर्षी येथे दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
 
या मंदिराची देखरेख श्री माता वैष्णोदेवी तीर्थ मंडळ या ट्रस्टद्वारे केली जाते. माँ वैष्णो देवी उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध सिद्धपीठ आहे.
 
वैष्णो देवी मंदिर हे शक्तीला समर्पित असून या धार्मिक स्थळाची देवता वैष्णो देवी ही माता राणी आणि वैष्णवी म्हणून ओळखली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती