ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाखांचे दागिने आणि भांडी पळवली

शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (17:00 IST)
बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील सोमेश्वरनाथ महादेव मंदिराच्या मुख्य गेटजवळ असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत उचकटून आणि गॅस कटरने तिजोरी कापून चोरट्यांनी चार लाखांहून अधिक रुपयांचे दागिने आणि भांडी चोरून नेली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी दुकान चालकाने ओपी पोलिसांकडे अर्ज केला. माहिती मिळताच ओपी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. वर्दळीच्या ठिकाणाजवळील दुकानाची भिंत कापून दुकानात प्रवेश करून दुकानाच्या तिजोरीचे तीन कुलूप गॅस कटरने कापून चोरीची घटना घडली. त्यामुळे ओपी पोलिसांच्या गस्तीवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.
हरसिद्धी पोलीस स्टेशन हद्दीतील धनंजय सिंग हा दुकानातील मुख्य कर्मचारी गुरुवारी रात्री उशिरा दुकान बंद करून घरी गेला. शुक्रवारी दुकान उघडले असता दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली.
दुकानाची दहा इंची भिंत कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरने तिजोरीचे तीन कुलूप तोडून चांदीचे दागिने, पितळी भांडी, थर्मास, सीसीटीव्हीचे डीव्हीआर असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. मात्र योगायोगाने सोन्याचे दागिने ज्या तिजोरीत ठेवण्यात आले होते . ती तिजोरी चोरट्यांना फोडता आली नाही. घटनास्थळावरून गॅस कटर आणि दुकानाच्या तिजोरीचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाबाबत ओपी पोलिसांनी मंदिरात लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. तपासात मंदिरातील सीसीटीव्ही रात्री नऊ वाजल्यापासून बंद असल्याचे आढळून आले. ओपीचे अध्यक्ष सुधीर कुमार यांनी ही चोरी प्रकरण लवकरच उघड करणार असल्याचे सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती