दिल्ली मधील शांति वन परिसरामध्ये एक भीषण कार अपघात झाला आहे. या कार मध्ये 5 जण प्रवास करित होते. तसेच या हे पाच ही लोक गंभीर जखमी झाले आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार हे पाच ही जण नशेमध्ये होते. व कार डिवाईडरच्या रॅलींगला धडकली.
या अपघाताबद्दल दिल्ली पोलिस म्हणाले की, काल हा अपघात घडला आहे. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समजले की, या पाच जणांनी कार भाड्याने घेतली होती. तसेच हे पाच जण वाढदिवस साजरा करून परतत होते. त्यावेळी गीता कॉलनी फ्लायओवर पार करतांना चालक महिलाने आपला फोन घेत फोन लावण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे तिचे कार वरील नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट लोखंडाची साइड रॅलींगला धडकली. ज्यामुळे वाहनाचे पूर्ण नुकसान झाले आहे. पोलिसांनी सांगितले महिला कारचालकची प्रकृती गंभीर आहे. तसेच इतर चार जणांवर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच कायद्यानुसार पुढील चौकशी सुरु आहे.