जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघातात गेल्या शुक्रवारीच 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा आकडा दररोज वाढत आहे. एमएस मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितले की, सध्या 18 लोक रुग्णालयात दाखल आहे, त्यापैकी 3-4 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील तीन जण व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वैद्यकीय पथक पूर्णपणे सक्रिय असून सर्व जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहे.