कोण होणार कॉंग्रेस अध्यक्ष, पक्षातून गांधी नावाला विरोध

कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि त्यातील अनेक नेते पक्ष सोडून गेले त्यामुळे राष्ट्रीय पक्षाची वाईट अवस्था झाली आहे. त्यात विरोध पक्षनेते पदही नाही त्यामुळे आता कॉंग्रेस पुढे आवाहन उभे राहिले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिल्यानंतर आता काँग्रेस पक्षामध्ये नवीन अध्यक्षाच्या शोधाला वेग आला आहे. एवढेच नाही तर प्रियांका गांधी अध्यक्ष होणार नाहीत असे स्पष्टीकरण गांधी परिवाराने दिले आहे. त्यामुळे आता पुढील काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचा असेल हे जवळपास निश्चित झाले आहे. दोन महिन्यात काँग्रेस अध्यक्षाची निवड केली जाईल. 
 
आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशा नावाचा विचार केला जात आहे की ज्या नावाला गांधी परिवाराची मूकसंमती असेल आणि ते नाव काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांनाही मान्य असेल. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील नेत्याचे नाव काँग्रेस अध्यक्ष पदासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. सध्या, केसी वेणुगोपाल आणि ज्योतिरादित्य सिंधिया ही नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. काँग्रेसचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील नेत्याकडे? काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, पुढील काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्रातून होऊ शकतो कारण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहेत तसेच महाराष्ट्रातील नेता काँग्रेस अध्यक्ष होणं हे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते. 
 
राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसला सध्या कोणताच अध्यक्ष नसल्याने बऱ्याच राज्यातील काँग्रेसचे संघटन कमकुवत होत चालले आहे. कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षावरील विश्वास उडत चालला आहे. दिल्ली मध्ये असणाऱ्या काँग्रेस नेत्यांना असे वाटत आहे की, काँग्रेस अध्यक्षपदाबाबाबत निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती पक्षाच्या हिताची नसून लवकरात लवकर काँग्रेसचा अध्यक्ष निवडणे गरजेचे आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. या राजीनाम्यावरून खूप चर्चा रंगली होती. काँग्रेस कार्यकारिणी समितीने हा राजीनामा फेटाळून लावला होता तरी राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले होते. प्रियांका गांधी यांना देखील काँग्रेस अध्यक्ष करू नका असं देखील त्यांचे मत होते यावरून गांधी घराण्याबाहेरील काँग्रेसचा अध्यक्ष करा असे त्यांना सुचवायचे होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती