राहुल गांधींनी पराभवावी जबाबदारी स्वीकारली, राजीनामा देण्याचा प्रस्ताव

गुरूवार, 23 मे 2019 (18:47 IST)
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातील पराभव मान्य केला. तरी वायनाड लोकसभा मतदारसंघातून त्यांना विक्रमी मतांनी विजयी झाले असून इतिहास रचला आहे. राहुल यांनी वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना ४ लाखांच्या मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. राहुल यांना वायनाडमध्ये एकूण ७ लाख ४५५ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सीपीआयचे पी. पी. सुनीर यांना २ लाख ७१ हजार २९४ मते मिळाली आहेत. दरम्यान, अमेठी येथे पिछाडीवर पडलेल्या राहुल गांधी यांनी स्मृती इराणींना शुभेच्छा दिल्या आहेत.  
 
आज जाहीर लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मोदींच्या नेतृत्तवाखाली एनडीएला दणदणीत विजय मिळाले असून काँग्रेस आणि यूपीएला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फ्रेसमध्ये पत्रकारांशी संवाद साधत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली आहे. राहुल यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्तावही दिला आहे. 
 
राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की आमची लढाई विचारधारेची लढाई आहे. त्यांनी म्हटले की आम्ही पुन्हा प्रयत्न करुन आमच्या विचारसरणील विजय मिळवून देऊ कारण आमचा प्रेमावर विश्वास आहे आणि प्रेमाचा कधीही पराभव होत नाही.
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पराभवाची जबाबदारी स्वीकारली. '' निवडणूक प्रचारादरम्यान, मी जनता मालक आहे, असे म्हटले होते. आता निकालांमध्ये जनतेने आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अभिनंदन करतो.'' असे राहुल गांधी म्हटले आहे. 
 
तसेच, अमेठीतून जिंकणं कठीण असल्याचा अंदाज राहुल यांना आला होता. त्यामुळेच त्यांनी वायनाडहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती