प्रियांका गांधी यांच्यावर अश्लिल टिप्पणी एकला अटक

बुधवार, 6 फेब्रुवारी 2019 (09:26 IST)
काँग्रेस नेत्या आणि नवनिर्वाचित सचिव प्रियांका गांधी यांच्या फोटोशी छेडछाड करत, सोशल मीडियावर अश्लिल टिप्पणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बिहार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याची जेलमध्ये पाठवले आहे. या संशयित आरोपीचे नाव  योगी सूरजनाथ आहे. योगी सूरजनाथ हा सोशल मीडियावर स्वत:ला नरेंद्र मोदींचा भक्त संबोधतो.
 
बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील बिनोदपूर परिसरातील योगी सूरजनाथ हा रहिवासी आहे. तो ट्विटरवरील ‘मिशन भाजप 2019’ चा उत्साही फॉलोअर देखील आहे. या व्यक्तीशी आपला काहीही संबंध नाही, असं भाजप जिल्हा प्रमुख मनोज राय यांनी स्पष्ट केले आहे. योगी सूरजनाथने 30 जानेवारीला केलेल्या ट्विटबाबत तक्रार पोलिसात दाखल झाली होती, सामाजिक कार्यकर्ते शाहीन सैय्यदने याबाबत तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी सूरजनाथला कटिहारमधून शोधून काढत त्याच्यावर गुन्हा दाखल केला, त्याला कोर्टात हजर केलं असता, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. निवडणुका जश्या जवळ येत आहेत तसे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर असे हौशी पक्ष समर्थक चुकीच्या पद्धतीने टीका देखील करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती