उत्तर प्रदेशच्या पिलिभीत मधील राहुल नगर गावात दोन कुटुंबातील सहा जणांनी नूडल्स आणि भात खाल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. उपचारानंतर ते घरी आल्यावर एका मुलाचा मृत्यू झाला. तर इतरांची प्रकृती खालावली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
उत्तर प्रदेशातील पुरणपूर तालुक्यातील राहुल नगर मध्ये राहणाऱ्या सीमाचे लग्न डेहरादूनच्या सोनू सोबत अनेक वर्षांपूर्वी झाले होते सीमा आपल्या मुलांना रोहन आणि विवेकआणि मुलगी संध्याला घेऊन माहेरी आली होती.
रात्री घरात नूडल्स आणि भात खाऊन सर्व जण झोपी गेले. काही वेळा नंतर सीमा, तिची तिन्ही मुले आणि बहीण संजू आणि वाहिनी संजनाची प्रकृती बिघडली. शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडले. घरी आल्यावर कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावली. यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले.
घटनेची माहिती मिळतातच आरोग्य विभागाचे दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेक ठिकाणांहून नूडल्सचे नमुने घेतले.हजारा पोलिस स्टेशनचे प्रभारी परमेंद्र सिंह यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.पुढील तपास सुरु आहे.