येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये महाविद्यालये, सरकारी, खासगी कार्यालयांनी सार्वजिनक सुट्टी असते. मात्र केंद्र सरकारने आता या जयंतीनिमित्त देशभरात सार्वजिनक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत केंद्रीय कामगार, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. यामुळे यंदापासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच शाळा, महाविद्यालये, सरकारी, खासगी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.
या निवेदनामध्ये केंद्राने स्पष्ट केले की, भारतामधील औद्योगिक कार्यालयांसह सर्व सरकारी कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act 1881 च्या सेक्शन २५ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी साजरी केली आहे.