मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (15:03 IST)
कर्नाटकातील व्यापारी मुमताज अली हे सकाळपासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलूर पुलाजवळ त्यांची कार सापडली. मुमताज अली हे जेडीएस एमएलसी बीएम फारुक आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहिउद्दीन बावा यांचे भाऊ आहेत. 

त्यांची कार कुलूर पुलाजवळ सापडली असून त्यांनी पुलावरून उडी मारली अशी शक्यता वर्तवली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, 3 वाजेच्या सुमारास ते आपल्या वाहनाने घरातून निघाले आणि त्यांनी 5 वाजेच्या सुमारास कुलूर पुला जवळ कार थांबवली. कारवर अपघाताच्या काही खुणा होत्या आणि त्यानंतर त्यांच्या मुलीने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. SDRF आणि तटरक्षक दल नदीत शोध घेत आहेत आणि त्यांनी पाण्यात उडी घेतली की नाही याचा शोध घेत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती