Breaking News :दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात दिवसाढवळ्या गोळीबार, कुख्यात बदमाश गोगी ठार; वकिलाच्या वेशात बदमाश आले

Webdunia
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (14:39 IST)
दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात शुक्रवारी खळबळ उडाली न्यायालयात गोळीबार झाला. या गोळीबारात कुख्यात गुंड गोगी ठार झाला आहे.पोलिसांनीही बदमाशांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आणि दोघांना ठार केले. सशस्त्र मारेकरी रोहिणी न्यायालयात वकिलाच्या वेशात आले होते आणि यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.असे म्हटले जात आहे की हे लोक कुख्यात बदमाश गोगीला मारण्यासाठी आले होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगीवर वकिलाच्या वेशात आलेल्या टिल्लू ताजपुरीया टोळीने हल्ला केला होता.

<

Delhi: Shots fired at Rohini court premises, at least three injured. Details awaited. pic.twitter.com/sQLu6nPiVz

— ANI (@ANI) September 24, 2021 >या हल्ल्यात 3 ते 4 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.पोलिसांनी परिसराची घेराबंदी केली आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख